घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

धक्कादायक प्रकार : वैध परवाना नसतानाही 30 वर्षे एसटी कंडक्टर ऑन ड्युटी ?

पुणे / महाराष्ट्र :
राज्य परिवहन महामंडळात (एसटी) मोठा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कंडक्टर क्रमांक 76281 यांचा वाहन परवाना (लायसन्स) 1995 मध्येच संपलेला असतानाही, संबंधित कर्मचारी सुमारे 30 वर्षे ऑन ड्युटी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सदर बाब निदर्शनास आल्यानंतर सध्या संबंधित कर्मचाऱ्याची ड्युटी बंद करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणात एसटी प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे.

“लायसन्स नूतनीकरण केलं तरी कर्मचाऱ्याला नोकरीतून बडतर्फ (Dismiss) करणार”
असे विधान केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

1. मग इतकी वर्षे त्याला ड्युटीवर का ठेवले?
2. कोणाच्या आशीर्वादाने हा प्रकार चालू होता?
3. प्रवासी सुरक्षेचा प्रश्न कुणाच्या जबाबदारीचा?

कायदेशीर बाबी (लागू होऊ शकणारे कायदे)
या प्रकरणात खालील कायद्यांतर्गत चौकशी होऊ शकते :
1. मोटार वाहन अधिनियम 1988
कलम 3 / 181 – वैध परवाना नसताना वाहन चालवणे / संबंधित कर्तव्य बजावणे
दंड / सेवा समाप्तीची तरतूद
2. IPC (भारतीय दंड संहिता)
कलम 420 – फसवणूक
कलम 468 / 471 – बनावट कागदपत्रे वापरणे (जर तसे आढळले तर)
3. प्रशासकीय चौकशी
डेपो मॅनेजर
संबंधित अधिकारी
वार्षिक सेवा तपासणी करणारे अधिकारी
यांच्यावरही निलंबन / चौकशी होऊ शकते.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें