घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*बारामती-भिगवण रोडवर लूटमार करणारी ‘पुणेरी टोळी’ पोलिसांच्या जाळ्यात

बारामती तालुक्यातील भिगवण-बारामती रोडवर कोयत्याच्या धाकाने प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीवर पोलिसांनी धाडसी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे.

या घटनेमुळे काही दिवसांपासून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा गुन्हा उघडकीस आला आहे.जैनकवाडी फाटा परिसरात 7 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

विश्वराजे उर्फ विश्वा चंद्रशेखर पाटील (वय 18) आणि त्यांचे सहकारी कॅरी गाडीतून प्रवास करत असताना 6 ते 7 जणांच्या टोळीने अचानक रस्त्यात अडथळा निर्माण करून वाहन थांबवले. आरोपींनी गाडीच्या काचा फोडत कोयता आणि लोखंडी दांडक्यांचा धाक दाखवून प्रवाशांवर हल्ला केला.

या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आला आणि मोबाईल, बॅगा, कागदपत्रे व रोख रक्कम असा सुमारे 12 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल लुटून आरोपी फरार झाले.घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.

भिगवण, दौंड आणि यवत पोलिसांना सतर्क करण्यात आले. मोटारसायकल आणि रिक्षाच्या मदतीने पळून जाणाऱ्या आरोपींचा केडगाव चौफुला-सुपा रोडवर पाठलाग करण्यात आला. या कारवाईत चार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले, तर एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तीन धारदार कोयते, एक बेसबॉल रॉड तसेच चोरीचा काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासात या टोळीने कुरकुंभ परिसरात पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावरही हल्ला केल्याचे समोर आले आहे.ग्रामीण भागात रस्त्यावर अडवून लूटमार करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध पोलिसांनी वेळेत कारवाई केल्याने नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे. रात्रीच्या प्रवासादरम्यान संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें