घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*किरकोळ वादातून बांधकाम मजुराचा खुनाचा प्रयत्न

किरकोळ वादातून दोघांनी बांधकाम मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. बांधकाम मजुराच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

या प्रकरणी मनीष अशोक साहू (वय १९) आणि मणीशंकर अशोक साहू (वय २१, दोघे रा. प्रतिकनगर, येरवडा) यांना अटक करण्यात आली. नंदकुमार जगेश्वर नेताम (वय ३७, रा. उत्तम टाऊन स्केप, प्रतिकनगर, येरवडा) असे गंभीर जखमी झालेल्योच नाव आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदकुमार नेताम आणि आरोपी साहू हे मुळचे छत्तीसगडमधील बमुरहड्डी गावातील रहिवासी आहेत. तिघे जण बांधकाम मजूर आहेत. ८ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नेताम आणि त्याची पत्नी नियोजित गृहप्रकल्पातील लेबर कॅम्पकडे निघाले होते. त्या वेळी आरोपी साहू तेथे थांबलेले होते.’

बिगारी कामगार नीट काम करत नाहीत’, असा टोमणा आरोपी साहू यांनी त्याला मारला. त्यानंतर नेताम याचा आरोपींशी वाद झाला. वादावादीतून त्यांच्यात हाणामारी झाली. आरोपी मनीष साहू तीक्ष्ण शस्त्र घेऊन तेथे आला. आरोपींनी नेताम याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. नेताम याच्या पत्नीने मध्यस्थी केली. तेव्हा आरोपींनी तिला धक्काबुक्की केली. नेताम याला वाचविण्यासाठी पत्नीने आरडाओरडा केला. नेताम याच्या मेहुण्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अनिल पाडेकर तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें