घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पांचगणी ‘पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप २०२६’चे भव्य उद्घाटन

वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालय आणि हाय फ्लाय पॅराग्लायडिंग यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पांचगणी येथे ‘पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप २०२६’चे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. युरोपीय देशांमध्ये प्रामुख्याने आयोजित होणाऱ्या या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मान यंदा प्रथमच भारतातील पांचगणीला मिळाल्याने सातारा जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. जगातील सुमारे २५ देशांतील २०० नामांकित स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले असून स्पर्धेच्या परीक्षणासाठी Paragliding World Cup Association चे अध्यक्ष गोरान यांच्यासह जागतिक दर्जाचे तज्ञ पंच उपस्थित आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, या स्पर्धेमुळे पांचगणीची ओळख केवळ पर्यटन स्थळापुरती मर्यादित न राहता जागतिक स्तरावरील ‘पॅराग्लायडिंग हब’ म्हणून निर्माण होईल. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी सांगितले की, या स्पर्धेमुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळून स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. १५ ते २१ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचा लाभ सर्वांनी घ्यावा,

असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आनंद चिरंगुटे, पांचगणी नगरपालिकेचे अध्यक्ष दिलीप बगाडे, दांडेघर गावच्या सरपंच सृष्टी खरात, माजी सरपंच शंकर कळंबे, नगरसेवक परवीन मेमन, नारायण बिरामणे, प्रकाश गोळे, सुप्रिया माने तसेच स्पर्धेच्या टेक्निकल टीममधील कृष्णकांत भागरा, श्री. दोहरा आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार असून पांचगणीकरांसह पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कार्यक्रमाचे स्वागत व आभार प्रदर्शन हाय फ्लाय पॅराग्लायडिंगचे चेअरमन अनुपम जाधव पाटील यांनी केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें