घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

भिलारच्या कन्येचा मानाचा मुकुट; आकांक्षा भिलारे ‘एमडीएस’ पदवीने सन्मानित

महाबळेश्वर प्रतिनिधी

‘पुस्तकांचे गाव’ म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण केलेल्या भिलार गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाबळेश्वर तालुक्याचे माजी नेते स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या परिवारातील कु. आकांक्षा नितीन भिलारे हिने दंतवैद्यकीय क्षेत्रातील ‘मास्टर ऑफ डेंटल सर्जरी’ (MDS) ही पदव्युत्तर पदवी संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. विशेष म्हणजे, भिलार गावातील ही पदवी मिळवणारी ती पहिलीच युवती ठरली आहे.
आकांक्षाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण भिलार येथील हिल रेंज संस्थेत पूर्ण केले. शिक्षणात सातत्याने प्रगती करत तिने पुढील शिक्षण पुण्यात घेतले आणि त्यानंतर दंतवैद्यकीय उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे प्रवेश घेतला. नवी मुंबई, नेरूळ येथील डी. वाय. पाटील विद्यापीठातून तिने अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर एमडीएस पदवी मिळवली.
अलीकडेच पार पडलेल्या पदवीदान समारंभात मान्यवरांच्या हस्ते तिला पदवी प्रदान करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणात यश संपादन केल्याने भिलारसह संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ती नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें