घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*शिवजयंतीनिमित्त पुणे शहराच्या वाहतुकीत मोठे बदल

पुणे शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यंदाही जल्लोषात पार पडणार आहे. गुरुवारी शहरात विविध ठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सार्वजनिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवात पुणेकर मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने वाहतूक पोलिसांनी शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वाहतूक शाखेने काही प्रमुख रस्ते तात्पुरते बंद केले असून वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गांची सोय केली आहे.

या प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद

मिरवणुकांच्या मार्गावर गर्दी टाळण्यासाठी लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता यांवर वाहतूक वळवण्यात आली आहे. या भागात जड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी नागरिकांना या परिसरात खाजगी वाहने आणणे टाळण्याचे आवाहन केले आहे. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 पासून ते सायंकाळी गर्दी संपेपर्यंत हे बदल लागू राहतील.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

शिवाजी महाराज रस्ता: जिजामाता चौकातून जाणाऱ्यांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक आणि टिळक रस्त्याचा वापर करावा.

गणेश रस्ता: दारूवाला पुलाकडून फडके हौद चौकाकडे जाणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातूनच परत वळवण्यात येईल.

बाजीराव रस्ता: पूरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्यांनी टिळक रस्ता, अलका टॉकीज आणि फर्ग्युसन रस्त्याने पुढे जावे.

केळकर रस्ता: मिरवणूक संपेपर्यंत अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक वळवली जाईल. वाहनचालकांनी केळकर रस्त्याने सरळ पुढे जावे.

लक्ष्मी रस्ता: सोन्या मारुती चौकात मिरवणूक असेपर्यंत वाहतूक संत कबीर चौकातून वळवली जाईल.

आपत्कालीन सेवांना प्राधान्य

पुणे शहरात दरवर्षी शिवजयंती उत्साहात साजरी होते, यंदा देखील तोच उत्साह कायम राहणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीत काही बदल करण्यात आले असले तरी रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांना जाण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. पुणेकरांनी आपली प्रवासाची योजना या बदलांनुसार करावी आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिस आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें