घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

जिल्हा परिषद पदाधिकारी ठरविताना एकत्रित विचार होणार

”पुणे आणि सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून एकत्रित लढण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार निवडणुका झाल्या.

पुणे जिल्हा परिषदेत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवून ५१ उमेदवार विजयी झाले. पदाधिकारी ठरवताना ५१ सदस्यांचा एकत्रित बसून विचार केला जाईल,” असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

पुण्यात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ”एकत्र निवडणूक लढल्याने उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे आम्ही जिल्हा परिषदेत पुढील पाच वर्षे एकत्रच आहोत. आमच्यात कोणतेही स्वतंत्र गट नसतील. पदाधिकारी निवड किंवा जिल्हा परिषद सभागृहातील सर्व बाबी या दोघांच्या एकत्रच होतील.

”उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चेबद्दल विचारणा केली असता पाटील म्हणाले, ”या प्रकारची कोणतीही चर्चा आमच्यापर्यंत आलेली नाही. पक्षाचे एकत्रीकरण किंवा विलीनीकरणासंदर्भातील निर्णय त्या-त्या पक्षाचे प्रमुख घेतात.”

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें