घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मित्रांसोबत फिरायला गेला, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एकोले गावाजवळ असलेल्या लोटस पॉईंट परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून, पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा असा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव आयुष हरिणखेडे असून त्याचे वय 21 वर्षे होते. तो मूळचा गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या पुण्यातील कात्रज भागात वास्तव्यास होता. आयुष आपल्या 5 मित्रांसोबत फिरण्यासाठी मुळशी तालुक्यातील या परिसरात आला होता. फिरताना सर्वजण लोटस पॉईंटजवळ पोहोचले. पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने आयुष पाण्यात उतरला. त्याला पोहता येत नसल्याने काही क्षणातच तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला.

मित्रांनी आरडाओरड करत मदतीसाठी हाक मारली. घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी तातडीने हालचाली करत बचाव पथकांना पाचारण केले. लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्यजीव रक्षक मावळ आणि मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. दुपारी 12:30 च्या सुमारास शोधकार्य सुरू करण्यात आले.

सुमारे दीड तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी 5:30 वाजता आयुषचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मात्र मृतदेह सुरक्षितपणे रस्त्यापर्यंत आणणे मोठे आव्हान होते. परिसरातील रस्ता नागमोडी, अरुंद आणि घसरडा असल्याने बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. अखेर रात्री 9:00 वाजता मृतदेह पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें