घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सासवडच्या ‘शिवसृष्टी’त शिवभक्तांची गर्दी

शिवजयंतीनिमित्त सासवड (ता. पुरंदर) नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘शिवसृष्टी’ या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातील ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन पाहण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती.

नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, नगरसेविका प्रियांका जगताप, लीना वढणे, स्मिता सुहास जगताप, अर्चना जगताप, शीतल भोंडे, स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांसह अनेक मान्यवर, नागरीक, तरुण आणि लहान मुलांनी शिवसृष्टी व ऐतिहासिक वस्तू प्रदर्शनाचा लाभ घेतला.माजी आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून या शिवसृष्टीची उभारणी झाली आहे.

या वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा, शिवमंदिर, राज्याभिषेक सोहळा, सिंहासनावरील पूर्णाकृती पुतळा, राजमुद्रा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध देखाव्यांची चित्रणे, शिवकालीन शस्त्रांचे पत्र तसेच दूरचित्रांची उभारणी करण्यात आली आहे.दरम्यान, सध्या अंथरुणावर खिळून असलेले येथील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते शरद ख्रिस्ती यांच्या कुटुंबीयांना शिवजयंतीनिमित्त स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांच्या वतीने किराणा किट देण्यात आले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें