घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यात कुस्तीच्या आखाड्यात राडा

कुस्तीच्या मैदानात जेव्हा दोन तगडे पैलवान एकमेकांसमोर उभे ठाकतात, तेव्हा श्वास रोखून धरणारा थरार पाहायला मिळतो. मात्र, पुण्यातील मुळशी तालुक्यातील पौड येथे आयोजित महाशिवरात्री उत्सवातील कुस्तीला गालबोट लागले आहे.

11 लाखांच्या इनामी कुस्तीत ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे यांच्यात झुंज सुरू असतानाच एका समर्थकाने आखाड्यात घुसून सिकंदरवर हात उचलण्याचा प्रयत्न केला.

नेमकं काय घडलं? तो 60 सेकंदांचा थरार

पौड येथील मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेत 17 फेब्रुवारी रोजी ही हायव्होल्टेज कुस्ती रंगली होती. सिकंदर शेख विरुद्ध माऊली कोकाटे अशी ही लढत पाहण्यासाठी चांगलीच गर्दी झाली होती. आयोजकांनी कुस्ती निकालीच होणार असे जाहीर केल्यामुळे दोन्ही पैलवान जीव तोडून लढत होते.

तासभराची झुंज अन् अचानक ‘तो’ आत घुसला

जवळपास एक तास दोघेही एकमेकांना भिडले होते. मात्र, वेळ जसा पुढे सरकला तशी कुस्ती आक्रमक झाली. माऊली कोकाटेने कुस्तीदरम्यान आक्रमक पवित्रा घेत सिकंदरच्या मानेवर प्रहार करण्यास सुरुवात केली. संयम सुटलेल्या सिकंदरनेही त्याला जाब विचारला आणि दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली.

दरम्यान, आखाड्याच्या कडेला उभा असलेला माऊली जमदाडेचा एक समर्थक अचानक आत घुसला. काही समजण्याआधीच त्याने थेट सिकंदर शेखवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. यामुळे आखाड्यात एकच खळबळ उडाली. आखाड्यात राडा सुरू झाल्याचे पाहून आयोजक आणि पंचांची धावपळ उडाली. प्रेक्षकांमध्ये प्रचंड संताप होता. वाद विकोपाला जातोय असं वाटत असतानाच, सिकंदरचे गुरु विशाल हारगुले यांनी स्वतः आखाड्यात आले. त्यांनी दोन्ही पैलवानांना शांत केले आणि पुन्हा कुस्ती लावण्याचा प्रयत्न केला. ज्यांचा व्हिडिओ आता व्हायरल होतं आहे.

शेवटी निकाल काय लागला?

तासभर चाललेली ही चकमक आणि त्यानंतर झालेला वाद यामुळे वातावरण तापले होते. अखेर बराच वेळ होऊनही कोणताही ठोस निकाल लागत नसल्याचे पाहून आयोजकांनी मध्यममार्ग काढला. ही कुस्ती सोडवण्यात आली आणि दोन्ही पैलवानांना विजयी घोषित करून वादावर पडदा टाकण्यात आला. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, कुस्तीच्या आखाड्यात खेळाडूवृत्ती हरवली का? असा सवाल कुस्तीप्रेमी विचारत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें