घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

भरधाव डंपर घरावर कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू

पुण्यातील मुळशीत रिंग रोड कामादरम्यान भीषण दुर्घटना घडली आहे.डंपर घरावर पलटल्याने घरातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. तसेच नागरिकांनी प्रशासनाकडे भरपाईची मागणी केली आहे.

मिळालेली माहितीनुसार, मुळशी तालुक्यात रिंग रोडचे रस्त्याच्या भरावाचे काम सुरू होते. यादरम्यान डंपर चालकाचा ताबा सुटल्याने डंपर थेट एका घरावर पलटला. या भीषण अपघातात घरात असलेल्या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिस,अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, रिंग रोडचे काम सुरू असताना सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि जड वाहनांची बेफिकीर वाहतूक हे या अपघातामागचे कारण असू शकते. मात्र, याबाबत अधिकृत चौकशी सुरू आहे. तसेच प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाइकांना मदत आणि नुकसानभरपाईबाबत मागणी करण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें