घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

द रायका स्कूल येथे शिवजयंतीनिमित्त रॅली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त पिंपळे सौदागर येथील द रायका स्कूल मध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शाळा परिसर भगव्या पताकांनी व प्रेरणादायी फलकांनी सजविण्यात आला होता.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित भाषण व पोवाडे सादर केले. यानंतर शाळेतून रॅलीला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी भगवे फेटे व पारंपरिक पोशाख परिधान करून शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदविला. ढोल-ताशांच्या गजरात रॅली उत्साहात पार पडली.

रॅलीतील प्रमुख आकर्षण म्हणून लेझीम पथकाचे सादरीकरण तसेच लाठी-काठी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.रॅलीदरम्यान शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. विद्यालयाच्या प्राचार्या पूनम रायका यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगरसेविका अनिता काटे व कुंदा भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप शाळेच्या प्रांगणात झाला. शिक्षक व कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने उत्सव यशस्वीरीत्या पार पडला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें