घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

देशाला धोका राहुल गांधींचा नव्हे तर मोदींचा-गोपाळदादा तिवारी

पुणे दि १९ – राष्ट्रपतींच्या भाषणावर संसदेत उत्तरा पासुन पळ काढणारे पंतप्रधान मोदी देशाच्या इतिहासातील पहिले पंतप्रधान असुन, सत्तापक्ष स्वतःचे उत्तरदायित्व लपवण्यासाठी ‘विरोधी पक्ष नेत्या’वर तथ्यहीन आरोप करत संसदीय मंत्री किरण रिजूजू बेजबाबदार विधाने करत देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.

ते पुढे म्हणाले की आजतागायत नोटबंदी, पुलवामा, पहेलगाम अतिरेकी हल्ले, मणीपुर अत्याचार, ॲापरेशन सिंदूर, परराष्ट्रीय धोरण, चिन घुसखोरी, अमेरिकन ट्रेड डील सारख्या अनेक गंभीर व महत्वाच्या विषयांवर संसदेत सारासार चर्चा करण्याचे धारीष्ट्य सत्ताधारी भाजप – एनडीए आघाडी सरकारने दाखवलेले नाही ही वास्तवता आहे.

१२ वर्षात एकाही पत्रकार परीषदेस सामोरे न गेलेले सत्ताधारी भाजपा’चे नेतृत्व केवळ विरोधी पक्ष नेत्यांवर निरर्थक गरळ ओकण्यातच धन्यता मानत आहे. देशातील जनतेने १० वर्षांचा मोदी-काळ’ अनुभवातुनच, राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या १००% जागा वाढल्याचे व सत्ताधारी भाजपच्या ३३ % जागा कमी झाल्याचे केंद्रीय मंत्री किरण रिजूजू सोईस्कर विसरतात काय (?) असा उपरोधिक सवाल ही काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा यांनी केला.

संसदेत कथित देशहिताच्या घेतलेल्या स्व-निर्णयांचे समर्थन देखील, चर्चेद्वारे करू न शकणाऱ्या भाषणजीवी सत्तापक्षाचाच् देशाला अधिक धोका आहे, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा नव्हे, असे खडे बोल ही काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केंद्रीय मंत्री किरण रिजूजू यांच्या कथित आरोपांवर प्रत्युत्तर दाखल सुनावलें .

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें