घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सराईत गुन्हेगाराकडून तीन पिस्तुलांसह १२ जिवंत काडतुसे जप्त

खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराकडून तीन पिस्तुलासंह १२ जिवंत काडतुसे जप्त केली. शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहिमेदरम्यान शाखेच्या युनिट-तीनच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.त्यामुळे संभाव्य मोठा गुन्हा टळल्याचे मानले जात आहे.

सागर दत्तात्रेय सोनलकर (वय २५, रा. धायरी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुन्हे शाखेच्या युनिट-तीनचे साहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, साहाय्यक उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे आणि पथकातील पोलिस अंमलदार किशोर शिंदे, योगेश झेंडे हे १८ फेब्रुवारी रोजी सिंहगड रस्ता आणि नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. त्या वेळी सोनलकर हा प्रयेजा सिटी, वडगाव बुद्रूक परिसरात आल्याची माहिती मिळाली.

त्याची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून तीन गावठी पिस्तूल आणि १२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपीला नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या सूचनेनुसार पथकातील मारुती पारधी, नितीन जगदाळे, कैलास लिम्हण, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें