विश्रांतवाडी परिसरातील एका कंपनीतून चोरट्यांनी शटर उचकटून ६३ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. मंगळवारी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी शॅडो फॅक्स टेक्नॉलॉजिज कंपनीच्या साप्रस शाखेतील कार्यालयाचे मुख्य शटर तोडले.
आत प्रवेश करून कपाट आणि डिजिटल लॉकर फोडून चोरी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली.
याबाबत कंपनीतील कर्मचाऱ्याने तक्रार दिल्यानुसार विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












