घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

दहावीच्या पहिल्याच पेपरला 11 कॉपीप्रकरणे; पुणे विभागात सर्वाधिक प्रकार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आयोजित दहावीच्या पहिल्याच पेपरला राज्यभरात कॉपीच्या 11 घटना उघड झाल्या. यांपैकी 10 प्रकरणे पुणे विभागात, तर एक नागपूर विभागात आढळले.इतर विभागांत कॉपीचे प्रकार शून्य राहिल्याची माहिती मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली.

शुक्रवारी सकाळच्या सत्रात दहावीचा मराठी विषयाचा पेपर झाला. त्याच वेळी ही प्रकरणे समोर आली. दुपारच्या सत्रातील परकीय भाषेच्या पेपरला एकही कॉपी झाली नाही. दरम्यान, बारावीच्या सकाळच्या सत्रातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयाचा पेपरही कोणत्याही गैरप्रकारांशिवाय पार पडला.

बहुतांश परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केल्याने यंदा कॉपीप्रकरणे तत्काळ उघडकीस येत असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात येत आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागाच्या माध्यमाद्वारे ही परीक्षा घेतली जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें