घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

इंद्रायणी नदी प्रदूषणास जबाबदार कंपन्यावर कारवाई

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीत प्रदूषण करणाऱ्या संबंधित कंपन्या व संस्थांवर प्रशासनामार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही.

इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही सामूहिक जबाबदारी स्वीकारून पुढाकार घ्यावा असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले.

महापौर रवी लांडगे,आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कु-हाडे यांच्या उपस्थितीत सात मावळे संवर्धन संस्थेमार्फत इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा मुख्य उद्देश इंद्रायणी नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधणे तसेच नदी स्वच्छतेसाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा होता.

या स्वच्छता मोहिमेदरम्यान महापौर लांडगे यांनी स्वतः इंद्रायणी नदीच्या पात्रात उतरून स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. प्रत्यक्ष पाहणी करताना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा, औद्योगिक सांडपाणी, प्लास्टिक कचरा तसेच इतर घातक घटकांची त्यांनी पाहणी करून नदीच्या प्रदूषणामागील संभाव्य कारणांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

या पाहणीनंतर महापौर लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून इंद्रायणी नदीत सोडण्यात येणारे प्रदूषित सांडपाणी, औद्योगिक कचरा आणि पर्यावरणास हानिकारक घटक यांस जबाबदार असलेल्या संबंधित कंपन्या तसेच इतर संस्थांवर प्रशासनामार्फत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला.

इंद्रायणी नदीचे पावित्र्य आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. याशिवाय या स्वच्छता अभियानामुळे नदी संवर्धनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले गेले असून भविष्यात अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

या उपक्रमात सात मावळे संवर्धन संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी अशा लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या मोहिमांना भविष्यात अधिक गती तसेच प्रोत्साहन दिले जाईल असे देखील महापौर लांडगे यांनी यावेळी सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें