घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कामशेत येथे अनाथाश्रमात वाढलेल्या युवकांचा विवाह सोहळा उत्साहात

आत्मगया फाउंडेशन, कामशेत येथे अनाथाश्रमात वाढलेल्या श्री. करण आणि सौ. शुभांगी या दोन्ही युवकांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

या मंगल प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. जयश्रीताई मोघे यांच्या माध्यमातून या संस्थेचा ब्रह्मांड संस्थांनशी संपर्क झाला. नवदाम्पत्याला शुभेच्छा व आशीर्वाद देण्याची संधी उपस्थितांना मिळाली.

आत्मगया संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक गोयल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ब्रह्मांड संस्थांनच्या वतीने श्री. चिंतामणी राऊळ, सौ. प्रिया राऊळ आणि कविता रेडकर यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

६० फळझाडे लागवडीचा संकल्प

या शुभ प्रसंगी ब्रह्मांड संस्थांनच्या सहाय्याने आत्मगया फाउंडेशनच्या कामशेत येथील परिसरात सुमारे ६० फळझाडे लावण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरणार आहे.

युवकांसाठी स्पर्धा परीक्षा व रोजगार मार्गदर्शन

या निमित्ताने संस्थेतील काही युवकांशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच स्पर्धा परीक्षा व नोकरी संदर्भातील आवश्यक मार्गदर्शन ब्रह्मांड संस्थांनच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. युवकांची शक्ती राष्ट्रसेवेत महत्त्वाचे योगदान देऊ शकते, याचा अनुभव या कार्यक्रमातून सर्वांनी घेतला.हा विवाह सोहळा केवळ दोन जीवांचा मिलाप नसून सामाजिक एकात्मता, प्रेम, जबाबदारी आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारा ठरला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें