घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

बालेवाडीतील नदीपात्रात अवैध वाळू उपसा

येथील मुळा नदीपात्रात वाकड स्मशानभूमीजवळ अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.दरम्यान, नदीपात्रात रात्रीच्या वेळी खड्डे खोदून वाळू उपसण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाळू नेमके कोण काढत आहे, हे समजू शकलेले नाही.

बाणेर- बालेवाडी परिसरात नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामामुळे नदीपात्र अरुंद होऊन येथील जीवसृष्टी नष्ट होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले होते. परंतु तरीही हे काम अजूनही सुरू आहे. त्यात आता वाळू उपशाचा प्रकार सुरू असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करत, वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महसूल विभागातील एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आम्ही नदीपात्रामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. या ठिकाणी नदीपात्रात खड्डे खोदून वाळू उपसा केल्याच्या दिसत आहे. काही ठिकाणी चाळलेली वाळू त्याच जागेवर आहे. या परिसरातील नागरिकांना याबद्दल विचारणा केली असता कोणीही काही माहिती द्यायला तयार नाही. तरी या ठिकाणी तपास करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें