घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा करून पावणेपाच लाखांची फसवणूक

नवीन क्रेडीट कार्ड देण्याच्या बहाणा करीत सायबर चोरट्यांनी ५० वर्षीय नागरिकाला एपीके फाईल पाठवली. त्यानंतर संबंधित फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडून सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ७३ हजार रूपये ऑनलाईन पद्धतीने वर्ग करून घेतले.

ही घटना १८ जुलै २०२५ रोजी कोथरूडध्ये घडली आहे. या प्रकरणी तक्रारदाराने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूडमध्ये राहायला असून, १८ जुलै रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. नवीन क्रेडीट कार्ड देण्याची बतावणी करीत तक्रारदाराला एपीके फाईल पाठविली आणि डाउनलोड करण्यास भाग पाडले.

त्यानुसार तक्रारदाराने फाईल डाउनलोड केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून रक्कम वर्ग करून घेतली. जवळपास पावणेपाच लाख रूपये खात्यातून कमी झाल्यानंतर संबंधिताने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी तपास करीत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें