घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

विवाहितेच्या छळप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आरोपी पोलीस ठाण्यात हजर

सुनेने माहेराहून पैसे आणावेत यासाठी तिचा हात गरम तव्यावर ठेवणे, पिस्तूल लावून धमकी देणे, गर्भपात करण्यासह विविध पद्धतीने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासरा आणि नणंदेविरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.या प्रकरणी आरोपींच्या वतिने अटकपुर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आले होते.

सत्र न्यायालयाने नणंदेचा अर्ज मंजूर करत इतर आरोपींचे अटकपुर्व जामिनाचे अर्ज फेटाळले होते. त्यानंतर आरोपींनी अनुक्रमे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र दोन्ही न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत अटकपूर्व जामीन फेटाळले.

त्यानुसार सोमवारी (ता.२३) आरोपी स्वतःहून लोहगाव पोलीस ठाण्यात हजर झाले. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याप्रकरणी पती आदित्य अनिल लोखंडे (वय २८), सासरे अनिल किसन लोखंडे (वय ५३), सासू सुवर्णा (वय ४८, सर्वजण, रा. मरकळ, ता. खेड) अशी अटकेत असलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत २६ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली होती.

लग्नात दोन कोटी २९ लाख रुपये खर्च, ५५ तोळे सोने, दोन किलो चांदी आणि फॉर्च्यूनर गाडी दिल्यानंतरही पतीचे दोन कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात येत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याबाबत लोहगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या प्रकरणी तपासाचे काम सुरु असून गुरुवारी (ता.२६) आरोपींची पोलीस कोठडीतील मुदत संपत आहे. त्यामुळे पुढील तपासाकरिता त्यांना न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करणार आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें