घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

श्री जे आणि युनायटेड प्रिंटर्सचे संचालक रवीन्द्र जोशी यांचे निधन

पुण्यातील प्रसिद्ध मुद्रण संस्था म्हणून ओळख असणाऱ्या श्री जे आणि युनायटेड प्रिंटर्सचे संचालक रवीन्द्र जोशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई श्रीमती माधवी, पत्नी रूपा, कन्या सौ.राधा, थोरले बंधू डॉ. राजीव व धाकटे बंधू चंद्रशेखर असा परिवार आहे.

जोशी यांचा जन्म ११ जानेवारी १९६३ रोजी झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण नूमवि मध्ये झाले. त्यानंतर त्यांनी बृहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज तसेच आयएलएस विधी महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.मुद्रण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनमध्ये त्यांनी अध्यक्ष आणि सचिव म्हणून काम पाहिले. तसेच ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स या संस्थेत दोन वेळा अध्यक्ष, तसेच खजिनदार आणि सचिव म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांच्या नेतृत्वामुळे या संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत झाली.

मुद्रण व्यवसाय आणि शिक्षण यांचा परस्परसंबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. नव्याने उद्योगात येणाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आणि तांत्रिक सेमिनार आयोजित करून त्यांनी मार्गदर्शन केले.

बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत उद्योगाच्या प्रगतीसाठी त्याचा प्रभावी वापर करण्यावर त्यांचा भर होता. व्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असत. त्यांच्या हसतमुख स्वभावामुळे आणि प्रभावी संवादकौशल्यामुळे ते सर्वत्र ‘रवीभाऊ’ म्हणून परिचित होते.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें