घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

नवविवाहितेने इमारतीवरून उडी घेऊन संपवलं जीवन, पुण्यातील घटना

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहीत लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यात आत्महत्या केली असल्याचं उघड झालं आहे. या नवविवाहितेने इमारतीवरून उडी मारून जीवन संपवलं ( असल्याचं उघड झालं आहे.

याप्रकरणी मृत महिलेच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे. दरम्यान या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुण्यातील बाणेर परिसरात घडली आहे. मृत महिलेचं नाव गंगा तेजस बेंबळकर (वय २७) असे आहे. तर तिच्या पतीचे नाव तेजस शिवा बेंबळकर असे आहे. तेजस याने अमेरिकेतून उच्चशिक्षण घेतले आहे. तेजस आणि गंगा यांचा विवाह ३ महिन्यांपूर्वी झाला. मात्र लग्नानंतर गंगाला सासरच्या मंडळींकडून छळाला समोर जावं लागलं. या छळाला कंटाळून गंगाने अवघ्या तीन महिन्यातच आपलं जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सासरच्या छळाला कंटाळून गंगा या नवविवाहितेने राहत्या इमारतीतून उडी मारून आत्महत्या केल्याचा आरोप गंगाच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. याप्रकरणी मृत पावलेल्या महिलेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून,नवरा, सासू, नणंद आणि सासरे यांच्या विरोधात पुण्यातील बाणेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी गंगाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून घटनास्थळी पंचनामा केला. त्यांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिलेने मृत्यूला स्वतः जबाबदार असल्याचे लिहिले मात्र महिलेच्या कुटुंबियांच्या आरोपांवरून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें