घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

बाप-लेकाचा तो प्रवास ठरला शेवटचा!

कात्रज व परिसरात अपघातांची मालिका सुरूच असताना शनिवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास वंडर सिटीसमोर कात्रजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भीषण अपघात झाला.

या अपघातात दुचाकीवरील तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ट्रक आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला. वडील आपल्या तीन वर्षांच्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असताना ट्रकची धडक बसली. या धडकेत चिमुकल्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

मृत मुलाचे नाव अंश भाऊरंग कांबळे (वय ३, रा. अंजनीनगर, कात्रज) असे आहे.या प्रकरणी ट्रक चालक इंद्रजित बाबुराव जानते (वय ५०, रा. निलंगा, लातूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

अवघ्या आठ दिवसांपूर्वी कात्रज डेअरीसमोर झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कात्रज व परिसरातील वाढते अपघात कधी थांबणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. त्यातच रस्ता निसरडा असल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढते. यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात होऊन अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

त्यामुळे या भागात तातडीने वेगमर्यादा, अवजड वाहनांवर नियंत्रण, रस्ता सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें