घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मला आमच्याच पक्षातले नेते बोलताय, तुम्ही अजितदादांच्या अपघातावर प्रश्न का विचारताय?; अमोल मिटकरी

अजित पवार यांच्या निधनाला आज एक महिना झाला. मात्र कुठल्याच प्रश्नांची उत्तर मिळाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.अजित पवारांचा अपघात की घातपात याची उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरू राहणार, असंही अमोल मिटकरींनी सांगितले.

रोहित पवारांसोबत मी आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांसोबत मी आहे. कुठल्याही पक्षाचा आमदार आमच्यासोबत असला तर त्यालाही सोबत घेणार, असं अमोल मिटकरी म्हणाले. मला आमच्याच पक्षातले नेते बोलताय, तुम्ही का प्रश्न विचारताय? तुम्ही अजित पवारांच्या अपघातावर का जास्त बोलताय? मला माहिती नाही ते असं का बोलत आहेत. पण मला जे योग्य वाटतं ते मी करतोय, असं अमोल मिटकरींनी यावेळी स्पष्ट केलं.

माझ्या पक्षातले काहीजण माझ्यासोबत प्रश्न उपस्थित करतात. आता बाकीचे का प्रश्न उपस्थित करत नाहीत? हे मी सांगू शकत नाही. राजकीय दृष्टिकोनातून जर रोहित पवार आमच्या पक्षाबद्दल बोलत असेल तर मी त्याला उत्तर देणार नाही. मी फक्त अजित पवारांच्या अपघाताबद्दल जर ते प्रश्न विचारत असेल तर त्यांच्यासोबत मी असेल, असंही अमोल मिटकरींनी सांगितले. अधिवेशन सुरू असताना आणि मागच्या महिन्याभरात एक दिवस असा गेला नाही अजित पवारांची आठवण आली नाही. अजूनही वाटतं सभागृहात अजित पवार येतील. आमच्याशी चर्चा करतील. देवगिरीला बैठकीला आमच्या सगळ्या आमदारांना बोलवतील, पण आता अजित पवार आमच्यात नाहीत, असं म्हणत अमोल मिटकरी भावूक झाले.

अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू-

अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. 28 जानेवारीला अजित पवार खाजगी विमानानेसकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत 29 जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें