घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

खंडोबा मंदिरात गैरप्रकार! गाभाऱ्यातून शिवलिंग पळवले

मुळशी तालुक्यातील मुलखेड येथील डोंगरावरील खंडोबा मंदिरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. अज्ञात समाजकंटकांनी मंदिरातील शिवलिंगाची तोडफोड करून त्याची चोरी केल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.शिवलिंगाची चोरी, मुळशीत खळबळ

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुलखेड गावाच्या हद्दीतील डोंगरावर असलेल्या खंडोबा मंदिरातील शिवलिंग लंपास करण्यात आले. स्थानिक नागरिक शिवाजी रघुनाथ तापकीर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासचक्र फिरवली आहेत.

या घटनेनंतर मंदिर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. चोरी झालेल्या ठिकाणी नवीन शिवलिंगाची स्थापना करून मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार आहे.

तर येत्या ११ मार्चपर्यंत आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. गावातील सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. परिसरात भाड्याने राहणाऱ्या सर्व बाहेरील व्यक्तींची माहिती आणि त्यांचा भाडेकरार पोलीस ठाण्यात जमा करणे आता घरमालकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. पौड पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें