घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

“खूप वेदनादायी”, अजित पवारांसाठी रोहित पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण झाला. 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये लँडिग करत असताना अजित पवार यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले.

या अपघातात अजित पवार यांच्यासह चौघांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. आज एका महिन्यानंतरही अजित पवार गेलेत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. या दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाला असून आज रोहित पवार यांनी भावनिक पोस्ट केली आहे.

रोहित पवारांचं भावुक ट्वीटअजित पवार यांच्या विमान अपघाताच्या बातमीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी तात्काळ अजित पवार यांना फोन केला, मात्र समोरुन कॉल उचलला नाही. आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन रोहित पवार यांनी भावुक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं, असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही, खूप वेदनादायी, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनीही भावुक पोस्ट करत अजित पवारांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. “आपले अजितदादा सोबत नाहीत, हे पचविणे अजूनही कठिण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बारामतीकरांनी जागवल्या आठवणी

दुसरीकडे, दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज एक महिना पूर्ण झाला. या धक्क्यातून अद्याप बारामतीकर सावरलेले नाहीत. बारामतीच्या नटराज कला दालनात आज भक्ती गीतांचा कार्यक्रम घेत दादांना सार्वजनिक श्रद्धांजली ही अर्पण करण्यात आलीये. याशिवाय अजितदादांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासातील फोटोंच्या संग्रहाच्या माध्यमातून दादांच्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें