घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सायकल ट्रॅक निघाले पण झाडं रस्त्यातच; वाहतुकीला अडथळा

महापालिकेने दोन महिन्यापूर्वी परिसरातील सायकल ट्रॅक काढून रस्ता रुंदीकरण केले आहे. मात्र या ट्रॅकवर असलेले काही झाडे व विद्युत खांब अद्यापही जागेवरच राहिल्याने या ठिकाणी वाहनांना अडथळा होवून वारंवार अपघाताचा धोका निर्माण होत आहे.

रस्त्यावरील वाहने व प्रदूषण कमी करणे, पर्यावरण पूरक वाहतुकीला वाव मिळवून देणे, उपलब्ध सायकलस्वारांसाठी सुरक्षित मार्गिका उपलब्ध करून देणे, यासाठी महानगरपालिकेने आठ-दहा वर्षांपूर्वी सायकल ट्रॅक निर्माण केले होते.

मात्र, ही योजना अपुऱ्या नियोजना अभावी काही महिन्यातच मोडकळीस आली. ट्रॅकच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष, व्यवसायिकांचे अतिक्रमण इतर वाहनांची ट्रॅक वर झालेली घुसखोरी व अनधिकृत पार्किंग यामुळे सायकल ट्रॅक केवळ नावापुरतेच उरले होते. वाहनांची वाढलेली संख्या आणि दोन्ही बाजूंनी असलेले सायकल ट्रॅक यामुळे येथील रस्ता अरुंद झाला होता.

ही बाब लक्षात घेवून पालिकेने नुकतेच हे ट्रॅक उध्वस्त करून मुख्य रस्त्यामध्ये अंतर्भूत केले आहेत.पालिकेने केलेल्या या बदलामुळे रस्त्यावरील वाहनांचा वेग वाढून कोंडी कमी होण्यास मदत होत आहे. मात्र सायकल ट्रॅक व मुख्य रस्ता यामध्ये असलेले विद्युत खांब व झाडे अद्यापही जागेवरच आहेत. फातिमानगर ते मगरपट्टा चौक या अंतरात ठिकठिकाणी असे खांब व झाडे अडथळा ठरत आहेत.

रात्रीच्या वेळी लक्षात न आल्याने वाहने धडकून छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे ही झाडे व विद्युत खांब यांचे स्थलांतर करून लवकरात लवकर रस्ता मोकळा व निर्धोक करावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

“पुणे-सोलापूर रस्त्यावरील सायकल ट्रॅक काढल्यामुळे रस्ता रुंद झाला आहे. त्यामुळे वाहनांचा वेगही वाढला आहे. मात्र, सायकल ट्रॅक व मूळ रस्ता यामध्ये असलेले विजेचे खांब व झाडे तशीच असल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने या खांबांचे व झाडांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करावे.”

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें