घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सोमेश्वर चषक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा; सिद्धांत गायकवाड, रियान मोहम्मद, जिनम, खंडेलवाल आघाडीवर

युवा सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने “सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवातील सोमेश्वर चषक खुल्या व विविध गटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीनंतर सिद्धांत गायकवाड, रियान मोहम्मद, संकलेचा जिनम, गोरांक्ष खंडेलवाल आणि विहान कांबळे यांनी प्रत्येकी ५ गुणांसह संयुक्त आघाडी घेतली आहे.

पाषाण येथील गोविंद गार्डन मंगल कार्यालयात सुरू असलेल्या या स्पर्धेत खुल्या गटात सिद्धांत गायकवाडने प्रथमेश शेरलाचा पराभव केला, तर दुसऱ्या पटावर रियान मोहम्मदने अंजनेय पाठकवर विजय मिळवत दोघांनीही ५ गुणांची कमाई केली.

१५ वर्षांखालील गटात संकलेचा जिनमने ईशान चोरडियावर मात करत ५ गुणांसह आघाडी कायम राखली. १२ वर्षांखालील गटात तीर्थ कोद्रेने नैतिक मानेसोबत बरोबरी साधून ४.५ गुण मिळवले, तर रौनक कोरेने अधिराज चांडेलचा पराभव करून ४.५ गुणांपर्यंत मजल मारली.१० वर्षांखालील गटात गोरांक्ष खंडेलवालने आदीना मोहंतीवर विजय मिळवत ५ गुणांची नोंद केली. ८ वर्षांखालील गटात विहान कांबळेने शिव चाकवेला पराभूत करत ५ गुणांसह अव्वल स्थान पटकावले.

स्पर्धेचे उद्घाटन सनी विनायक निम्हण आणि पीएमसीचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी एमसीएचे महासचिव राजेंद्र कोंडे, दिक्षा गडसिंग, स्पर्धा समन्वयक अभिजीत मोहिते, अमित मुरकुटे तसेच मुख्य पंच पवन कातकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सनी विनायक निम्हण म्हणाले, “बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून तो एकाग्रता, संयम आणि निर्णयक्षमता वाढवणारा बौद्धिक व्यायाम आहे. ‘सुपर सनी मंथ’ अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांद्वारे तरुणांना सकारात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले असून भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवावे, हीच अपेक्षा आहे.”

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें