घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सुनेत्रावहिनींचे व्हिडिओ व्हायरल केल्यास कायदेशीर कारवाई करू; रूपाली ठोंबरेंचा इशारा

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे.त्यानंतर त्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा देखील झाल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा वरचष्मा दिसला. यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच त्यावेळी सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर हात टाकलेले नेते, याचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि नगरसेविका रूपाली ठोंबरे पाटील यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

नेमकं काय म्हणाल्या रूपाली ठोंबरे?

सुनेत्रा अजितदादा वहिनी यांच्याबद्दल जे व्हिडिओ व्हायरल करत आहात ते अत्यंत चुकीचे आहे. सुनेत्रावहिनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री झालेले आहे.आता त्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या आहेत.या आधी पासून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माऊली म्हणून कुटुंबातील स्नेहाने मोठ्या वहिनी म्हणून पक्ष घर, सांभाळतच होत्या. त्याच्यामुळे सातत्याने जे आपण आज व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल करत आहात त्यात

धनंजय भाऊ मुंडे यांनी त्यांना हात दिला प्रफुल पटेल यांनी त्यांना पुढे जाण्यासाठी हात दिसत असले तरी तो आईसमान वहिनी माऊली,भगिनी म्हणून दिलेला आहे. वास्तविक पाहता धनंजय भाऊ मुंढे हे श्रीमती सुनेत्रा वहिनीने मुलासारखे सांभाळले आहे. धनंजय भाऊ मुंडेंना सुनेत्रावहिनी आईसमान आहे त्या नात्याने कुटुंबातील स्नेह नात्याच्या मुलाच्या हक्काने त्यांनी तो हात दिला होता.

दुसरा विषय प्रफुल भाई पटेल यांचा तर प्रफुल भाई पटेल हे त्यांचे मोठे दीर भावासमान आहेत. त्यांनी दादांसोबत 25, 30 वर्ष काम करत असताना त्यांना सुद्धा कुटुंबातील स्नेह या भावनेनेच वहिनी बहिणीसारखी म्हणून त्यांच्याकडून तो हात पुढे आला होता.आपल्या अजितदादांच्या दुःखद निधनानंतर झालेली अवस्था ही अत्यंत भावनिक,मानसिक वेदनादायक होती आजही आहे.पण आता सुनेत्रावहिनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत त्यामुळे सर्व शिष्टाचार,प्रोटोकॉल,नियम नक्कीच पाळले जातील.विनाकारण कृपया जाणीवपूर्वक विडिओ वायरल करू नये.

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीचे सोशलावर विनापरवानगी घेता चुकीचे विडिओ वायरल केल्यास कायदेशीर कारवाई आम्हाला करावी लागेल.त्यामुळे कळकळीची नम्र विनंती असेल कृपया असे विडिओ तयार करून वायरल करू नये. असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि नगरसेविका रूपाली ठोंबरे पाटील यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें