घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

मद्य सेवन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत तीन दिवसांत ३०१ वाहनचालकांवर कारवाई केली. अपघातांना आळा घालण्यासाठी आणि रस्ते सुरक्षिततेसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत शहरातील विविध भागांत ३० नाकाबंदी पॉइंट उभारण्यात आले होते. ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या साहाय्याने वाहनचालकांची तपासणी करण्यात आली.

यावेळी मद्य सेवन करून वाहन चालविताना आढळलेल्या ३०१ जणांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.यापूर्वी २५ फेब्रुवारी रोजी शहरातील ३० ठिकाणी ‘सरप्राईज ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ कारवाई करण्यात आली.

अचानक लावलेल्या नाकाबंदीत ३१ मद्यपी वाहनचालक आढळून आले. अपघात प्रतिबंध, रस्ते सुरक्षितता वाढविणे, नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें