घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

येरडव-मुंबई, पाचल-कल्याण गाडी सुरू’ शिमगोत्सवात दिलासा;

येरडव-मुंबई दिवसा धावणारी गाडी पूर्ववत सुरू करणे, पाचल-डोंबिवली-कल्याण आणि पुणे-अक्कलकोट या मार्गावर एसटी सेवा सुरू झाल्या आहेत. ऐन शिमगोत्सवामध्ये सुरू झालेल्या गाड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखरूप झाला आहे.

राजापूर तालुक्यातील येरडव-मुंबई या मार्गावर दिवसा धावणारी एकमेव एसटी बंद असल्यामुळे स्थानिक प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. कामानिमित्त, शैक्षणिक तसेच वैद्यकीय कारणांसाठी दररोज मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्यांना अडचणींना सामोर जावे लागत होते.

सध्या शिमगोत्सव (होळी उत्सव) सुरू असल्याने गावाकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यामुळे येरडव-मुंबई ही दिवसा धावणारी गाडी तत्काळ पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

ही मागणी पाचल व्यापारी संघटनेकडून करण्यात आली होती. पाचल येथून कल्याणकडे जाणारी थेट एसटी नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यामुळे राजापुर आगारामार्फत पाचल डोंबिवली-कल्याण अशी नवीन एसटी सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. पुणे-अक्कलकोट या मार्गावरही एस.टी. सेवा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें