घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

हिंदुत्वनिष्ठांच्या रोषानंतर भोर (पुणे) येथील शाळेत विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास मुख्याध्यापकांची अनुमती

न्हावी (भोर) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कपाळावर टिळा लावण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद अखेर मुख्याध्यापकांच्या स्पष्टीकरणानंतर शांत झाला. या घटनेमुळे काही काळ शाळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मिळालेल्या माहितीनुसार, न्हावी (ता. भोर) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एस. एन्. कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी कपाळावर टिळा लावून शाळेत येऊ नये, अशी सूचना केल्याचा आरोप काही पालक व स्थानिक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी केला.

ही बाब परिसरात समजताच काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते शाळेत दाखल झाले आणि त्यांनी मुख्याध्यापकांना या संदर्भात जाब विचारला.यावेळी कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना टिळा लावून शाळेत येण्यास कोणतीही मनाई करू नये, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवत त्यांना टिळा लावण्याची मुभा द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेमुळे काही काळ शाळा परिसरात चर्चा आणि वादाचे वातावरण निर्माण झाले.वाढता वाद लक्षात घेऊन मुख्याध्यापक एस. एन्. कांबळे यांनी आपले स्पष्टीकरण दिले. त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांना टिळा लावून येण्यास कोणतेही बंधन घालण्यात आलेले नसल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना टिळा लावून शाळेत येण्यास कोणतीही मनाई नसून तसे करण्यास मुभा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, भविष्यात विद्यार्थ्यांच्या धार्मिक आचारांवर कोणतेही निर्बंध घालण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

या घटनेनंतर स्थानिक पालकांमध्येही चर्चा सुरू असून शाळांनी विद्यार्थ्यांच्या धार्मिक भावना आणि परंपरांचा आदर राखत निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें