घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

बुधवार पेठेत वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर फरासखाना पोलिसांनी छापा टाकून चार बांगलादेशी महिलांची सुटका केली. नोकरीच्या आमिषाने भारतात आणून त्यांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.

परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावळे यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या पथकाने गुरुवारी (ता. ५) रात्री जनता बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर वेश्या व्यवसायावर छापा टाकला. यावेळी घरात चार बांगलादेशी महिला आढळून आल्या. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बांगलादेशी एजंट मुल्ला, तसेच बाबू भैया उर्फ पापा शेख (रा. बुधवार पेठ), भोपसिंग राजपूत (रा. जनता बिल्डिंग, बुधवार पेठ) आणि इमारत मालक मीनाक्षी रमेश मेत्री (रा. बुधवार पेठ) या चौघांविरुध्द अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी भोपसिंग राजपूत याला अटक केली असून, इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त रावळे यांनी दिली.नोकरीचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललेआरोपींनी या बांगलादेशी महिलांना ब्युटी पार्लर किंवा शिवणकामाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून भारतात आणले.

त्यानंतर त्यांना धमकावून आणि पैशांचे प्रलोभन दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. महिलांना एका खोलीत ठेवून त्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांवर आरोपी उदरनिर्वाह करत असल्याचे तपासात समोर आले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें