घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

‘पीएमपी’ची महिलांसाठी खास भेट! महिलादिनी अवघ्या पाचशे रुपयांत सहल

जागतिक महिला दिनानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) महिला आणि पर्यटकांसाठी विशेष भेट जाहीर केली आहे. स्वारगेट मुख्य बस स्थानकावरून येत्या ८ मार्च रोजी ८ प्रसिद्ध पर्यटन मार्गांवर विशेष वातानुकूलित ई-बस सेवा सोडण्यात येणार आहेत.

अवघ्या ५०० रुपयांत पर्यटकांना दिवसभर निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांची सफर घडणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांना धार्मिक, ऐतिहासिक व निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळांचा आनंद घेता यावा, यासाठी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. या पर्यटन बससेवेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, ८ मार्च २०२६ रोजी महिला दिनानिमित्त खास ८ बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

असे आहेत विशेष पर्यटन मार्ग…

मार्ग क्र. १

(हडपसर गाडीतळ) : कानिफनाथ गड, मोरगाव गणपती, जेजुरी आणि सासवड दर्शन. (वेळ : सकाळी ९ ते संध्याकाळी ६)

मार्ग क्र. २

(हडपसर गाडीतळ) : सासवड (संगमेश्वर मंदिर), नारायणपूर (दत्त मंदिर), म्हस्कोबा मंदिर (कोडीत). (वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ६.३०).

मार्ग क्र. ५

(पुणे स्टेशन) : फ्लॉवर पार्क, पानशेत धरण, जंगल सफारी आणि पक्षी संग्रहालय. (वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ६.३०).

मार्ग क्र. ७

(पुणे स्टेशन) : वाडे बोल्हाई, तुळापूर (संभाजी महाराज समाधी), रांजणगाव गणपती, मोराची चिंचोली आणि पाबळ. (वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ६.३०).

मार्ग क्र. १२

(पुणे स्टेशन) : भुलेश्वर मंदिर, माळशिरस, प्रति त्र्यंबकेश्वर, सासवड (संगमेश्वर, चांगावटेश्वर) आणि बनेश्वर. (वेळ: सकाळी ८.३० ते रात्री ७).

मार्ग क्र. ११

(स्वारगेट) : एकवीरादेवी मंदिर, कार्ला लेणी आणि लोणावळा परिसर. (वेळ: सकाळी ९ ते रात्री ७.३०).

मार्ग क्र. ९

(स्वारगेट) : पौडगाव, श्री सत्य साईबाबा आश्रम, हाडशी, चिन्मय विभूती आणि कोळवण. (वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ६.३०).

मार्ग क्र. ६

(पुणे स्टेशन) : रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, दरेकर वाडा आणि यवत. (वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३०).

येथे करता येईल बुकिंग

पर्यटन बससेवेसाठी प्रतिप्रवासी ५०० रुपये तिकीट दर असून, डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, महापालिका भवन, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी आणि निगडी बसस्थानक येथील पास केंद्रांवर बुकिंग करता येईल.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें