घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

एस. पी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

विद्यार्थिनींचे भाषण, नृत्य, नाटिका व महान महिलांच्या वेशभूषा स्पर्धांनी कार्यक्रम रंगला

पुणे प्रतिनिधी :

अमर एज्युकेशन सोसायटी संचलित एस. पी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. अरुण भाऊ सोकांडे सर व शाळेच्या संस्थापिका सचिव माननीय सौ. मंगलताई सोकांडे मॅडम उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून असिस्टंट कमिशनर सहकार नगर, धनकवडी रिलिजनल ऑफिस माननीय सौ. सुरेखाताई भनगे, नवनिर्वाचित नगरसेविका माननीय सौ. वर्षाताई तापकीर आणि माननीय सौ. सीमा बेलदरे उपस्थित होत्या. शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री. रेळेकर सर यांचीही यावेळी उपस्थिती होती.

प्रमुख पाहुण्यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित केले. समाजाच्या प्रगतीसाठी महिला आणि पुरुष दोघेही समान असून महिलांना योग्य सन्मान, संधी आणि पाठबळ मिळाल्यास त्या समाजाला अधिक उंचीवर घेऊन जाऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात विद्यार्थिनींनी भाषण, कविता, नृत्य, नाटिका तसेच महिलांच्या विविध वेशभूषेतील स्पर्धा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले, झाशीची राणी आणि कल्पना चावला यांसारख्या महान महिलांच्या वेशभूषा परिधान करून त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला.

यावेळी संस्थापिका सचिव सौ. मंगलताई सोकांडे मॅडम यांनी आपल्या भाषणातून महिलांच्या कर्तृत्वाचा, त्यागाचा आणि संघर्षाचा गौरव केला. समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून आजच्या युगात महिला शिक्षण, विज्ञान, क्रीडा, उद्योग आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शातून प्रत्येक मुलीने शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात पालक महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. अमर सोकांडे सर तसेच मुख्याध्यापिका माननीय सौ. पल्लवी सोकांडे मॅडम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत आत्मविश्वास, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, असे सांगितले. शिक्षण हे उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली असल्याचे सांगत अभ्यासाबरोबरच चांगले संस्कार, शिस्त आणि मेहनत यांना महत्त्व देण्याचे आवाहन त्यांनी केले.

शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें