घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सर्वोदय सेवा ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त गरजू महिलांना साडी वाटप, मिठाईवाटप व वृक्षरोपण

वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे

वाई, दि. ८ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्वोदय सेवा ट्रस्ट, वाई (जि. सातारा) महिला समूहाच्या वतीने वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील जांभळी पारट वस्ती, धनगर वस्ती व कोळीवाडा परिसरातील गोरगरीब व गरजू महिला भगिनींसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गरजू महिलांना साडी व मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच पारट वस्ती येथील मंदिर परिसरात फुला-फळांच्या आठ झाडांचे वृक्षरोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पारट वस्ती येथील माऊलीच्या मंदिरात हरिपाठाने करण्यात आली. धार्मिक व भक्तिमय वातावरणात कार्यक्रमास सुरुवात झाल्यानंतर महिला दिनाचे महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले. या प्रसंगी बोलताना वैशालीताई वाडकर यांनी स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित करत महिलांना मार्गदर्शन केले. स्त्री ही शक्ती, प्रेम, त्याग आणि प्रेरणेचे मूर्तिमंत रूप असून प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीमध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे महिलांना योग्य सन्मान व संधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच पुरुषांनीही स्त्रियांच्या भावना, विचार, कष्ट, त्याग, आवडी आणि कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांच्या आरोग्याची व सन्मानाची काळजी घेतली पाहिजे. स्त्रीचा सन्मान जपला गेला तरच समाज अधिक सशक्त व प्रगत होईल, असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. यावेळी सर्वोदय सेवा ट्रस्टच्या महिला पदाधिकारी लक्ष्मीताई कळंबे, शकुंतला जेधे-देशमुख, छाया वाडकर, सरस्वती वाशिवले, वंदना फणसे, मंगल महाडिक तसेच रेश्मा चिकणे, रेखा जांभळे, संगीता जांभळे यांच्यासह परिसरातील महिला भगिनी व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्वोदय सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संजय जेधे-देशमुख तसेच प्रकाश वाडकर, संतोष वाडकर, ज्ञानदेव वाशिवले व इतर संचालकांनी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें