घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाशाचा हल्ला. सुरक्षा कर्मचारी यांची तात्काळ मदत.

पुणे प्रतिनिधी : शांताराम लांघे

दि.(८) सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला रवीवार सुट्टीचा दिवस असल्याने थोडीफार सिंहगड किल्लावर वर्दळ होती.खाऊ गल्ली जवळ काही हुल्लडबाज पर्यटक मुलांनी गडाच्या तटबंदीखाली आग्या मोळ मधमाशांच्या पोळ यांना दगड मारला यामुळे मधमाशा भाबंवल्या, रागीट रुप धारण करून त्यांनी जवळ उपस्थित असणाऱ्या पर्यटकांवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये युवाशं ऋषिकेश सोनार या दिड वर्षाच्या चिमुकल्या बाळावर तसेच त्याचे कुटुंब ऋषिकेश नरेंद्र सोनार,निधी ऋषिकेश सोनार, कविता प्रसार सोनार,अंश प्रसाद सोनार तिथे उपस्थित नंदकुमार सिंधू घारगे वर (६८) रा.भोसरी यांना पन्नासहुन अनेक मधमाशांनी चावा घेतला .त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.अशा अनेक पर्यटकांवर आग्या मोळ मधमाशांनी हल्ला केला. ही माहिती गडावरील पुरातत्व विभाग, वनविभाग वनव्यवस्थापन समिती सुरक्षा कर्मचारी यांना समजतात त्वरित घटनास्थळी धाव घेऊन त्वरित जागोजागी धुर केला व.जखमींना टेच्यरच्या साह्याने खाली आणले .वनविभाग वनव्यवस्थापन समिती सुरक्षा कर्मचारी तानाजी खाटपे, मंगेश गोपणे यांनी त्वरित गाडीत बसवून स्वताच्या गाडीने सुखरूप दवाखान्यात घेऊन आले .काही जखमी पर्यटकांना हवेली आपत्कालीन बचाव पथक प्रमुख तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदिप सोलकर त्यांच्या रेस्कूटिमने आपल्या गाडीत बसवून सुखरूप दवाखान्यात दाखल केलं.

मधमाशा पुर्ण गडावर सैरावैरा हल्ला करत होत्या पुढे थोका घडू नये हे गांभिर्य ओळखून वनविभाग वनपाल -समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वायकर यांनी त्वरित दोन्ही चेकपोस्ट नाका बंद ठेवण्याचे आदेश दिले.वनविभाग, वनव्यवस्थापन समिती घेरा सिंहगड सुरक्षा कर्मचारी यांनी चेकपोस्ट नाका बंद ठेवला. पर्यटक गडांवर जाऊ नये म्हणून खबरदारी घेतली.गडावरील पर्यटक सुखरूप खाली पाठवण्यात आले व जखमींना सुखरूप खाली आणण्यात आले या कामासाठी पुरातत्व विभाग स्वप्निल सांबरे, श्रीकांत लांघे, हर्षद गायकवाड, सुमित रांजाणे, दत्ता जोरकर,दिपक जोरकर, राहुल जोरकर वन विभाग, वनव्यवस्थापन समिती सुरक्षा कर्मचारी नितीन गोळे,रोशन पन्हाळकर , बच्चन पढेर यांनी मोलाचे सहकार्य, योगदान केले.सिहगड किल्ल्यावरील पर्यटकांची सुरक्षा यासाठी तेथील सुरक्षा कर्मचारी किती तात्पर्य आहे .यावरून दिसून येते.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें