घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून महिलांची फसवणूक

बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून ज्येष्ठ महिलांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. आरोपीकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी मूळचा लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील असून, त्याच्याविरुद्ध पुण्यासह लातूर, कराड शहरातील पोलिस ठाण्यांत अपहरण, अत्याचार आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

दिलीप विश्वनाथ स्वामी उर्फ जाधव (वय ५२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गर्दीच्या ठिकाणी एका महिलेला बनावट सोन्याची बिस्किटे दाखवली. ‘तुमच्या गळ्यातील सोन्याची साखळी सुरक्षित पिशवीत ठेवा’, असे सांगून तो दागिने घेऊन फरार झाला होता.

या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासादरम्यान, आरोपी त्याच्या साथीदारासह हडपसरमधील कॅनॉल रस्ता परिसरात चोरीच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक क्रमांक दोनमधील पोलिस अंमलदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखिले यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपीने २४ जुलै रोजी शनिवारवाड्यालगत एका मंदिराजवळ ज्येष्ठ महिलेची फसवणूक केल्याची कबुली दिली. याशिवाय आरोपीने कराड येथेही अशाच पद्धतीने एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक करून तिचे मंगळसूत्र लंपास केल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे.आरोपीकडून बनावट सोन्याची दोन बिस्किटे आणि एक सोनसाखळी जप्त करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक गौरव देव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें