घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शहरातील स्मशानभूमीतील गॅस पुरवठा सुरळीत

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे प्रोपेन आणि ब्यूटेनच्या पुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे गॅस टंचाई दूर झाली असल्याने शहरातील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी गॅस दाहिन्यांचा वापर महापालिकेने सुरु केला आहे.अशी माहिती पुणे महापालिकेच्या विद्युत विभाग प्रमुख मनीषा शेकटकर यांनी दिली.

हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीने महापालिकेला सध्यातरी १० गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले असून, भविष्यात हा पुरवठा नियमित राहण्याची शक्यता आहे. शहरात सध्या २० गॅस आणि १० विद्युत दाहिन्या कार्यरत आहेत.एका मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी साधारणपणे ३० ते ३५ किलो गॅस लागतो आणि एका सिलिंडरचा खर्च सुमारे ४ हजार ६०० रुपये येतो.

गॅस दाहिन्यांव्यतिरिक्त शहरात विद्युत आणि लाकूड दाहिन्यांची पुरेशी सोय असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.येरवडा आणि खराडीसारख्या विविध स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरळीत सुरू असून पर्यायी व्यवस्थाही सज्ज ठेवण्यात आली आहे.

विद्युत दाहिन्यांचा मासिक खर्च २० लाख रुपयांपर्यंत जात असला तरी पर्यावरणपूरक पर्याय म्हणून नागरिक याला पसंती देत आहेत.गॅस पुरवठा कायम राखण्यासाठी महापालिका सातत्याने कंपन्यांशी पत्रव्यवहार करत असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

अंत्यसंस्कार प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता पालिकेकडून घेतली जात असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शेकटकर यांनी केले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें