घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

राजगुरुनगरमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यान

”स्त्रीमध्ये देवदत्त शक्ती असून तिचा वापर करून महिलांनी अभ्यासाने आणि प्रयत्नांनी स्वव्यक्तिमत्त्व फुलवावे,” असे आवाहन राज्य को-ऑपरेटीव्ह बँक्स असोसिएशनच्या संचालिका योगिनी पोकळे यांनी केले.

महिला दिनानिमित्त राजगुरुनगर सहकारी बँकेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. यावेळी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे संचालक दिनेश ओसवाल, संचालक राजेंद्र सांडभोर, संचालिका विजया शिंदे, अरुण थिगळे, सहायक सरव्यवस्थापक दिलीप मलघे, शंकर कोल्हे, प्रभावती गव्हाणे, कल्याणी सुतार आदी उपस्थित होते.

पोकळे म्हणाल्या, ”स्त्रियांनी पारंपरिक आचार विचारांच्या प्रक्रियेतून बाहेर पडले पाहिजे. चौकटीबाहेरचा विचार करून स्वतःचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व फुलविले पाहिजे. आत्मविश्‍वास वाढविला पाहिजे. स्वतःचा दर्जा उंचावत नेऊन कुटुंब, संस्था, समाज आणि देशाची प्रगती केली पाहिजे.” बँकेच्या वतीने महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. सूत्रसंचालन चैताली पाटोळे यांनी केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें