घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

नांदेड सिटीत पिस्तुलातून गोळी झाडून तरुणाने संपविले जीवन

नांदेड सिटी परिसरात २१ वर्षीय तरुणाने पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळावरून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करत तपास सुरू केला आहे.

पार्थ बापू गोरे (वय-२१, रा. आसावरी इमारत, नांदेड सिटी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक गणेश कसबे यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ गोरे हा नांदेड सिटीत त्याच्या मामाकडे वास्तव्यास होता.मंगळवारी (ता. १०) आसावरी इमारतीतील एका सदनिकेत तरुणाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासादरम्यान पार्थने पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले.

जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे.

या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पार्थने आत्महत्या का केली याचा तपास सुरू आहे. तसेच, त्याच्याकडे आलेले पिस्तूल कोणाकडून मिळाले, याचाही शोध पोलिस घेत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें