घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

इंदू, गीत बहिणींनी प्रथमच ऐकली आईची हाक

देहूरस्‍ता येथे कंपनीत कामगार असलेल्‍या मल्‍लेश कानडे यांना ‘इंदू’ ही पहिली मुलगी झाली. कुटूंबात आनंदाचे वातावरण होते. परंतू, तिला कितीही बोलले तरी प्रतिसाद द्यायची नाही. आईवडिलांनी दीड वर्षांनी तपासणी केली असता ती मूकबधिर असल्‍याचे समजले.

डॉक्‍टरांनी तिच्‍या कॉक्लियर इंप्‍लांट शस्त्रक्रियेसाठी दहा लाखाचा खर्च सांगितल्‍याने महिन्‍याला १३ हजार रुपये पगार असलेल्या कानडी कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली. संकट येथे थांबले नव्‍हते. दोन वर्षांनी त्‍यांना ‘गीत’ दुसरी मुलगी झाली. तीही मूकबधिर असल्‍याने दोन्हीही मुली बोलू शकत नसल्‍याने कुटुंबाला मानसिक धक्का बसला.

मात्र, त्‍यांना आधार दिला तो ‘राष्‍ट्रीय बाल स्‍वास्‍थ्‍य कार्यक्रमा’ने यातील डॉक्‍टरांच्‍या पथकाने मार्गदर्शन केल्‍याने एका मुलीचे कॉक्लियर इंप्‍लांट कार्यक्रमातून तर दुसरे मुख्‍यमंत्री सहायता निधीतून गेल्‍या महिन्‍यात मोफत झाले अन दोघींनी प्रथमच आई बाबांची हाक ऐकली.दोन्‍ही मुलींच्‍या २० लाखांच्‍या शस्त्रक्रिया कशा करायच्‍या या विवंचनेत असताना त्‍यांना जवळच्‍या अंगणवाडीतून आशेचा किरण मिळाला.

सहा महिन्‍यापूर्वी ‘राष्‍ट्रीय बाल स्‍वास्‍थ्‍य कार्यक्रम’ (आरबीएसके) मधील पिंपरी चिंचवड येथील क्रमांक १ च्‍या पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पाटील व पथकातील डॉ. प्रिती दिवाणे -भिसे, औषध निर्माण अधिकारी विकास सोळसे व परिचारिका जयश्री बोरचटे त्‍यांच्‍या अंगणवाडीमध्ये मुलांची आरोग्य तपासणीसाठी आले.त्‍यामध्‍ये त्‍यांनी तीन वर्षाच्‍या इंदुची तपासणी केली असता ती मूकबधिर असल्‍याचे समजले. त्‍यांनी कानडी कुटुंबीयांना संपर्क केला व योजनेतून तिची शस्त्रक्रिया मोफत करून देण्‍याचे आश्‍वासन दिल्‍याने त्‍यांचा जीव भांड्यात पडला.

सर्व वैद्यकीय व प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करून साडेतीन वर्षांची इंदू व सव्‍वा वर्षाची गीत या दोघींची कॉक्लियर इंप्‍लांट शस्त्रक्रिया २८ जानेवारीला मोरया रुग्‍णालयात कान नाक घसातज्‍ज्ञ डॉ. अक्षय वाचासुंदर यांनी केल्‍या.

काय आहे ‘आरबीएसके’?

बालकांमधील जन्मजात आजार, विकासातील अडथळे आणि इतर गंभीर आरोग्य समस्यांचे लवकर निदान करून मोफत उपचार देणारा ‘राष्‍ट्रीय बाल स्‍वास्‍थ्‍य कार्यक्रम’ (आरबीएसके) हा आरोग्‍य कार्यक्रम राज्यातील बालरुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे.

राज्‍यात १ हजार ११० पथके कार्यरत असून अंगणवाडी आणि शाळांमधील नियमित आरोग्य तपासणीमुळे हजारो मुलांना वेळेवर उपचार मिळत असून गेल्या तीन वर्षात सुमारे ७४ हजार ५११ शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्‍यापैकी ८ हजार १८७ शस्त्रक्रिया ह्रदयाच्‍या संदर्भात आहेत.

‘मला दोन्‍ही मुलींच्‍या शस्त्रक्रियेची विवंचना पडली होती. मात्र, ‘आरबीएसके’ व मुख्‍यमंत्री सहायता निधीतून दोघींच्‍या शस्त्रक्रिया मोफत झाल्‍या. आता त्‍यांना ऐकायला यायला लागले आहे. ही बाब त्‍यांचा नवीन जन्‍म झाल्‍यासारखी असून त्‍या आता ‘वायसीएम’ रुग्‍णालयात स्‍पीच थेरपी घेत आहेत. आम्‍ही सर्व डॉक्‍टर पथकाचे आभारी आहोत’.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें