घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

वाई एमआयडीसीमध्ये कामगारांची पिळवणूक? शिव कामगार सेनेचा गंभीर आरोप

वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे

वाई एमआयडीसी परिसरातील अनेक कंपन्यांकडून कामगारांची पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना शिव कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. योगेश आनंदराव फाळके यांनी सातारा येथील कामगार आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर केले आहे. शिव कामगार सेनेला मिळालेल्या तक्रारीनुसार वाई एमआयडीसी परिसरातील काही कंपन्यांमध्ये कामगारांकडून १२ ते १८ तास काम करून घेतले जात असून त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही, तसेच शासनाने ठरवलेले किमान वेतन (Minimum Wages) देखील दिले जात नसल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी कामगारांना ईएसआय (ESI) आणि पीएफ (PF) सारख्या कायदेशीर सुविधा दिल्या जात नाहीत. कामगारांवर मानसिक दबाव टाकणे, सुरक्षिततेच्या साधनांचा अभाव, तसेच स्थानिक युवकांना रोजगार न देता मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारांना कामावर ठेवण्याचा प्रकारही सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाई एमआयडीसी परिसरातील अर्थ फाउंड्री, गरवारे, वॉल रोप्स, गरवारे जेल, मालाज इंडस्ट्रीज, भारत पेट्रोलियम, फुल्ट्रोन तसेच इतर काही कंपन्यांविरोधात अशा प्रकारच्या तक्रारी येत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

याबाबत तात्काळ चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, सर्व कामगारांना किमान वेतन, ईएसआय व पीएफ सुविधा देणे बंधनकारक करावे, तसेच स्थानिक युवकांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शिव कामगार सेनेतर्फे करण्यात आली आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास शिवसेना व शिव कामगार सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही शिव कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. योगेश आनंदराव फाळके यांनी दिला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें