घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

आळंदीतील वारकरी सदल बाबा दर्ग्यातील रोजा इफ्तारमध्ये सहभागी

पुणे: विविध धर्मीयांमध्ये ऐक्य, बंधुता आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देणारा रोजा इफ्तार कार्यक्रम बुधवारी संध्याकाळी ऐतिहासिक सदल बाबा दर्गा परिसरात उत्साहात पार पडला. सर्वधर्म समभाव ट्रस्टचे अध्यक्ष इकराम खान यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात आळंदीतील वारकरी, मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या कार्यक्रमाला श्रीक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ रंधवे यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच पोलीस उपायुक्त (क्षेत्र चार) चिलुमुला रजनीकांत, येरवडा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अंजुम बागवान आणि लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र कदम हेही कार्यक्रमाला उपस्थित होते.

विविध धर्मांचे अनुयायी एकत्र येऊन रोजा इफ्तारमध्ये सहभागी झाल्याने परिसरात सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले. आळंदीतील वारकऱ्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक स्वरूप देणारी ठरली. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समतेचा, करुणेचा आणि सर्वसमावेशकतेचा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.

यावेळी बोलताना सर्वधर्म समभाव ट्रस्टचे अध्यक्ष इकराम खान यांनी सांगितले की, हा रोजा इफ्तार कार्यक्रम केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून विविध समाजघटकांमध्ये परस्पर स्नेह आणि विश्वास वाढवण्याचे व्यासपीठ आहे. भारताची खरी ताकद विविधतेतील ऐक्यात आहे. श्रद्धा वेगवेगळ्या असल्या तरी मानवता एकच आहे.

रमजान महिन्यातील रोजा आपल्याला संयम, करुणा आणि इतरांविषयी सहानुभूती ठेवण्याची शिकवण देतो. उपवास हा केवळ अन्नत्याग नसून आत्मशुद्धी, इच्छांवर नियंत्रण आणि मानवतेची जाणीव वाढवण्याचा मार्ग आहे.आळंदीतील वारकरी आणि विविध धर्मांचे अनुयायी जेव्हा सदल बाबा दर्ग्यात एकत्र येऊन इफ्तार करतात, तेव्हा प्रेम, आदर आणि बंधुता हीच समाजाची खरी पायाभरणी असल्याचा प्रभावी संदेश समाजात जातो, असेही त्यांनी नमूद केले.

हिंदू आणि मुस्लिम समाजाने नेहमीच परस्परांच्या सण-उत्सवात सहभागी होत सलोख्याने सहजीवन जगले आहे, ही परंपरा अशा उपक्रमांमधून अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी सांगितले.वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनीही या उपक्रमाचे कौतुक केले.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ रंधवे यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या शिकवणीत समता, करुणा आणि सर्वभूतांप्रती बंधुभाव याला विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी रोजा इफ्तारमध्ये सहभागी होणे म्हणजे त्या एकात्मतेच्या आणि भक्तीभावाच्या परंपरेचा अनुभव घेणे होय. अशा कार्यक्रमांमुळे विविध समाजघटकांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होतात.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी एकत्रितपणे रोजा सोडत देशातील शांतता, समृद्धी आणि सामाजिक ऐक्यासाठी प्रार्थना केली. परस्पर शुभेच्छा आणि संवादातून सामाजिक सलोख्याचा संदेश पुन्हा अधोरेखित झाला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें