घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

ओतूर परिसरात गॅसचा मोठा तुटवडा; हॉटेल व्यावसायिकांवर ‘चूल’ पेटवण्याची वेळ

ओतूर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस मिळत नसल्याने सामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले असून, हॉटेल व्यावसायिकांना पुन्हा पारंपारिक चुलीवर अन्न शिजवण्याची वेळ आली आहे.या परिस्थितीमुळे परिसरात गॅसचा काळाबाजार होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओतूर आणि आसपासच्या ग्रामीण भागात गॅस वितरणाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक ग्राहकांनी महिनाभरापूर्वी नोंदणी करूनही त्यांना अद्याप सिलिंडर मिळालेले नाही. गॅस वितरणावेळी ग्राहकांच्या मोबाईलवर येणारा OTP (ओटीपी) वेळेवर येत नसल्याने वितरण ठप्प होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी ग्राहक आणि गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि वादाचे प्रकार घडत आहेत.

व्यावसायिक सिलिंडरचा साठा उपलब्ध नसल्याने हॉटेल मालक हवालदिल झाले आहेत. नाईलाजास्तव अनेक मोठ्या हॉटेल्समध्ये लाकडाचा वापर करून चुलीवर स्वयंपाक केला जात आहे, ज्यामुळे ग्राहकांना सेवा देण्यास विलंब होत आहे.

काळाबाजाराची टांगती तलवार

अधिकृत गॅस एजन्सीकडे ‘नो स्टॉक’चा फलक दिसत असताना, दुसरीकडे काही ठिकाणी अव्वाच्या सव्वा दराने सिलिंडर विकले जात असल्याची चर्चा आहे. टंचाईचा फायदा घेऊन काही मध्यस्थ गॅस टाक्यांचा साठा करून तो चढ्या दराने विकून काळाबाजार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.”आम्ही पंधरा दिवसांपासून गॅसची वाट पाहत आहोत. ऑनलाईन बुकिंग करूनही गॅस मिळत नाही आणि एजन्सीवर गेल्यावर सर्व्हर डाऊन असल्याचे सांगितले जाते. तासनतास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परत जावे लागते.”

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें