घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सेविकांवर वाढता ताण, बालकांच्या पोषणासाठी पर्यायी नियोजन

गॅस सिलिंडर तुटवड्याचा परिणाम हा राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहुतांश जिल्ह्यांकडे सध्या साधारण पंधरा दिवस पुरेल इतकाच गॅससाठा उपलब्ध आहे.परिस्थिती लक्षात घेऊन एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालयाने पर्यायी नियोजन सुरू केले आहे.

राज्यात एक लाख १० हजार ६३१ अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून, या केंद्रांमधून दररोज ६६ लाख ५९ हजार ६५० बालकांना पोषण आहार दिला जातो. केंद्रांपैकी सुमारे ६५ ते ७० टक्के ठिकाणी स्वयंपाकासाठी गॅसचा वापर केला जातो. त्यामुळे गॅसपुरवठा नियमित राहणे आवश्यक मानले जात आहे.

राज्यातील गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयाकडून जिल्हा परिषदांतील महिला व बालकल्याण विभागांकडून माहिती मागवली आहे. त्यामध्ये किती अंगणवाड्यांमध्ये गॅसवर आहार तयार केला जातो, उपलब्ध गॅस किती दिवस पुरेल, याचा आढावा घेण्यात आला. बहुतांश जिल्ह्यांनी पुढील पंधरा दिवस पुरेल इतका साठा असल्याची माहिती आयुक्तालयाला पाठविली आहे.

ग्रामीण भागातील अनेक अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस बालकांना अन्न शिजवून देतात. दररोजच्या स्वयंपाकासाठी अंगणवाडी सेविकेला प्रतिलाभार्थी मानधन स्वरूपात खर्च दिला जातो, इंधनाचा खर्च शासनाकडून केला जातो. तर शहरी भागात बचत गट, महिला मंडळांच्या माध्यमातून बालकांना आहार पुरवला जातो.

दृष्टिक्षेपात

राज्यातील अंगणवाडी केंद्रे

१,१०,६३१

अंगणवाडीतील बालकांची संख्या

६६,५९,६५०

ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रे

७३,११६

आयुक्तालयाकडून सध्याच्या गॅस परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माहिती मागविण्यात आली. पुणे जिल्ह्यातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. बालकांच्या पोषण आहारावर परिणाम होऊ नये, यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. साधारण पुढील पंधरा दिवस पुरेल एवढा गॅस उपलब्ध असून, पुढील उपाययोजना करण्यात येतील.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें