काहीही काम करत नाही आणि मद्यपान करतो या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाच्या बरगडीत चाकू खुपसून जखमी केले. ही घटना चाकण येथे घडली. या प्रकरणात लहान भावाने उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या मोठ्या भावावर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील लोक जेवणासाठी पोहे बनवण्यासाठी कांदा कापत असताना आरोपी आणि फिर्यादी यांच्यात कामावरून वाद झाला.
संतापलेल्या आरोपीने हातातील कांदा कापायच्या चाकूने भावाच्या डाव्या बरगडीवर वार करून त्यांना जखमी केले. चाकण पोलीस तपास करत आहेत.












