मोबाइल फुटल्यानंतर नवा मिळाला नाही म्हणून माहेरी आलेल्या विवाहितेने आत्महत्या केली. चऱ्होली येथे सोमवारी (ता. १६) दुपारी पाऊणच्या सुमारास हा प्रकार घडला.
वैष्णवी सावन दहिवाल (वय २५, रा.जालना) असे तिचे नाव आहे.त्यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दीड वर्षांची मुलगी आहे. त्यांचे वडील चऱ्होलीतील पंतप्रधान आवास योजनेतील इमारत क्रमांक सहा येथे राहतात. त्या मागील आठवड्यातच माहेरी आल्या होत्या.
कुटुंबीय नवा मोबाइल देत नसल्याने त्या चिडचिड करायच्या. सोमवारी घरातील एका खोलीतून त्या खूप वेळ बाहेर आल्या नाहीत. अखेर दरवाजा तोडण्यात आला, तेव्हा वैष्णवी यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.












