घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

टायर फुटून क्रूझर थेट ट्रकवर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ क्रूझर गाडीने ट्रकला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आलीय. मंगळवारी सकाळी लोणी देवकरजवळ क्रूझर गाडीचाटायर फुटला आणि गाडी समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली.अपघात इतका भीषण होता की क्रूझरच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, इंदापूरमध्ये लोणी देवकरजवळ पुणे सोलापूर महामार्गावर क्रूझर गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. क्रूझर समोरून येणाऱ्या टर्कवर आदळल्यानं झालेल्या या अपघातात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.क्रूझरमधून तिघे जण प्रवास करत होते. तिघेही लोणी देवकर इथं एमआयडीसीमध्ये खासगी कंपनीत काम करत असल्याची माहिती समोर आलीय.

अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास कऱण्यात येत आहे. गाडीचा टायर फुटल्यानंतर गाडी दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. क्रूझर गाडीचा यात चुराडा झाला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें